भाजप नेते आशिष शेलारांनी घेतली संजय राऊतांची भेट !

0

मुंबई: काल प्रकृती बिघडल्याने शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी झाली आहे. थोड्यावेळापूर्वी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची लीलावती रुग्णालयात भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान आता भाजप नेते आशिष शेलार देखील संजय राऊत यांची भेट घेतली आहे. राजकारणात मतभेद असले तरी वैयक्तिक नाते जपण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला जात असतो. त्यामुळेच आशिष शेलार हे संजय राऊत यांची भेट घेतली आहे.

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी देखील संजय राऊत यांची भेट घेतली आहे.