भाजप नेत्यांनी रात्री राज्यपालांची घेतली भेट

मुंबई : वेट आणि वॉचच्या भूमिकेत असलेले भाजपा नेते रात्री अ‍ॅक्सन मोडमध्ये आले आहेत. या सर्व प्रमुख नेत्यांनी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. आज सायंकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीहून परत आल्यानंतर यांच्या शासकीय निवासस्थानी सागर बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीला भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रविण दरेकर, प्रसाद लाड आदी उपस्थित होते. बैठकीत ठरल्याप्रमाणे हे सर्व नेते राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी गेले. या सरकार मधील काही आमदार सरकार सोबत नसल्याचा दावा त्यांनी केला. राज्यपाल यांनी यावर निर्णय घ्यावा अशी माहिती विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यामी माध्यमांना सांगितलं. राज्यपालांनी पत्र स्विकारले असून यावर राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे