भाजप प्रवेशासाठी दिली 5 कोटींची ऑफर!

0

आमदार हर्षवर्धन जाधवांचा आरोप

मुंबई : भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी 5 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा आरोप शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही ऑफर दिल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. यासंदर्भातील वृत्त एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटल्या.

निवडणुकीचा सर्व खर्च करू
माझ्यासह 25 आमदारांना भाजपप्रवेशासाठी पैशांची ऑफर देण्यात आली होती. मागील महिन्यात चंद्रकांत पाटील यांनी एका भेटीदरम्यान ही ऑफर दिली होती, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला. पक्षात आल्यास निवडणुकीचा खर्च भाजपाकडून करण्यात येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते, असेही हर्षवर्धन यांनी सांगितले. हर्षवर्धन जाधव हे औंरगाबादच्या कन्नड मतदारसंघाचे आमदार आहेत.