भाजप मंत्री मुख्तार नकवी यांच्या इफ्तार पार्टीत तीन तलाकचे समर्थन; व्हिडीओ पहा

0

नवी दिल्ली-भाजप सरकारने मुस्लीम समुदायात असलेल्या तीन तलाक पद्धतीला विरोध करीत ही पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कायदा करण्यासाठी हे बिल संसदेत मांडण्यात आले. मात्र याला अनेक विरोध होत आहे. खुद्द मुस्लीम समुदायातील महिलांना देखील तीन तलाक पद्धत कायम रहावी असे वाटते. याचा प्रत्यय केंद्रात मंत्री असलेले मुख्तार अब्बास नकवी यांनी त्यांच्या निवासस्थानी रमजाननिमित्त इफ्तार पार्टी ठेवली होती. या पार्टीत महिलांना निमंत्रण देण्यात आले होते. मुस्लीम समुदायातील महिलांनी या इफ्तार पार्टीत तीन तलाक पद्धतीचे समर्थन केले असून ही पद्धत आम्हाला मान्य असल्याचे सांगितले आहे.

केंद्रात मंत्री असल्याने मुख्तार अब्बास नकवी हे तीन तलाक पद्धतीला विरोध करतात व ही पद्धत बंद व्हावी या मागणीला ते समर्थन देतात. मात्र त्यांच्याच घरी इफ्तार पार्टीला आलेल्या मुस्लीम महिलांना तीन तलाक पद्धत कायम रहावी असे वाटते.