मुंबई: राज्यात सत्ता स्थापनेवर भाजप-शिवसेनेत बिनसले आहे. युतीत लढून देखील शिवसेनेने मुख्यमंत्री पदावरून भाजपपासून फारकत घेतली आहे. मुंबई महापालिकेत देखील भाजप-शिवसेना युती होती. त्यामुळे आता मुंबई मनापातून भाजप शिवसेनेला आता पाठींबा देणार नाही, हे जवळपास निश्चित आहे. आता मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवार देणार असल्याचे बोलले जात होते. मात्र भाजपने उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्वीटरवरून याबाबत माहिती दिली आहे. तसेच २०२२ च्या निवडणुकीत भाजप मुंबई महापालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन करेल असा दावाही त्यांनी केला आहे. आम्ही आता तुल्यबळ आहोत मात्र आमच्याकडे संख्याबळ आमच्याकडे नाही असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी देखील भाजप निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे.