भाजप युवा मोर्चातर्फे शालेय साहित्य वाटप

0

वडगाव-मावळ : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, वडगाव शहर यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कौतूक सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना दोन हजार वह्या तसेच ज्येष्ठ नागरिकांना 200 छत्र्यांचे वाटप करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी दिगंबर भेगडे, तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे, भास्करराव म्हाळस्कर, अविनाश बबरे, बाळासाहेब घोटकुले, पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळस्कर, उपसभापती शांताराम कदम, जिल्हा परिषद सदस्या अलका धनिवले, पंचायत समिती सदस्या जिजाबाई पोटफोडे, ज्योती शिंदे, दीपाली म्हाळस्कर, प्रवीण चव्हाण, राणी म्हाळस्कर, लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, अरूण लाड, हर्षल होगले, वडगावचे सरपंच संभाजी म्हाळस्कर, सुधाकर ढोरे, भाऊसाहेब ढोरे, नारायणराव ढोरे, दीपक बबरे, महेंद्र म्हाळस्कर, अमोल पगडे, बबनराव म्हाळस्कर, सोपानराव ढोरे, बाळासाहेब कुडे, अरविंद पिंगळे, बबनराव भिलारे आदी उपस्थित होते.

संयोजनात यांचा हातभार
गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप संभाजी म्हाळसकर व अनंता कुडे यांच्या वतीने करण्यात आले. तर सोमनाथ ढोरे यांच्या वतीने छत्र्यांचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष रवींद्र काकडे, शंकर भोंडवे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंता कुडे यांनी केले. आभार शंकर भोंडवे यांनी मानले.