भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्षपदी – मितेश गादिया

0

शिरूर : शिरूर शहर भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी येथील मितेश गादिया यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष केशव लोखंडे,प्रदेश चिटणीस दिलीप हिंगे,खरेदी विक्री संघाचे संचालक आबासाहेब सोनावने,नगरसेवक संदीप गायकवाड,चव्हानवाडीचे सरपंच चव्हान,महेशकाका बेंद्रे,जयसिंगजी पाचर्णे,सागर सातारकर,राजु शेख,शिवाजी गाडे,विजय नरके,हर्षद ओस्तवाल, संकेत रासकर, सागर सारंगधर, व इतर मान्यवर उपस्थीत होते.

युवकांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांच्या अडीअडचणी तसेच त्यांच्या न्याय्य हक्कांच्या मागण्या सोडवण्यासाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नवनियुक्त भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मितेश गादिया यांनी निवडीनंतर सांगितले.