भाजप व टीआरएसच्या अहंकार आणि भ्रष्ट्राचारामुळे जनता त्रस्त-राहुल गांधी

0

नवी दिल्ली-तेलंगणा राज्याची निर्मिती ‘आदर्शवाद’ या मुद्द्यावर झाली होती मात्र गेल्या चार वर्षात भारतीय जनता पार्टी आणि सत्तारूढ़ तेलंगाना राष्ट्र समिती (टीआरएस)च्या अहंकार आणि भ्रष्ट्राचारामुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश असल्याचे आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. ट्वीट करत त्यांनी भाजप आणि टीआरएसवर निशाना साधला आहे.

तेलंगणा राज्याची निर्मिती झाली तेंव्हा आदर्शवाद आणि महान स्वप्न जनतेला दाखविले गेले. मात्र ते पूर्ण झाले नाही. कॉंग्रेस हे स्वप्न पूर्ण करेल असे आश्वासन देखील राहुल गांधी यांनी दिले आहे. आज राहुल गांधी तेलंगणा येथे प्रचारसभेला संबोधित करणार आहे.