भाजप सरकार शेतकर्‍यांच्या हिताचे -वाघ

0

वाडा । महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकार हे शेतकर्‍यांच्या हिताच्या दृष्टीनेच निर्णय घेत असून, शेतीसाठी विवीध चांगल्या योजना सरकारने राबवल्याचे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. भारतीय जनता पार्टीच्या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यामुळे भाजप सरकारने केलेल्या विकासकामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी वाडा येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

1भाजप सरकारने शेतीसाठी जलयुक्त शिवारसारखी चांगली योजना राबवल्याने शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात शेतजमीन सिंचनाखाली आल्याने ही योजना शेतकर्‍यांसाठी वरदान ठरल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
21972 साली आलेल्या दुष्काळापेक्षाही 2014 चा दुष्काळ मोठा होता. मात्र, या दुष्काळातही सरकारने विवीध योजनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना दिलासा दिला. त्यामुळे हे सरकारच यश असल्याचेही त्यांनी सांगितले.
3शेतकर्‍यांनी मागितलेली कर्ज माफी केली नसून भाजप सरकारने कर्ज मुक्ती केल्याने खर्‍या अर्थाने सरकारने शेतकर्‍यांचे हित केल्याने शेतकर्‍यांना समाधान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
4 मध्यंतरीच्या काळात कोळशाची कमतरता असल्याने चार दिवस विजेची कमतरता आली असल्याने त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करून यापुढे असा प्रश्‍न पुन्हा भेडसावणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.