भाजप सर्जिकल स्ट्राईकचा गाजावाजा का करीत आहे-शत्रुघ्न सिन्हा

0

नवी दिल्ली-भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सर्जिकल स्ट्राइकचे संपूर्ण श्रेय घेणाऱ्या भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘सर्जिकल स्ट्राइकचे श्रेय घेण्यासाठी पोस्टर-बॅनर्स लावून मोठा गाजावाजा केला जात आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांगलादेशची निर्मिती केली, तेव्हाही एवढे पोस्टर-बॅनर्स लागते नव्हते, जेवढे आज लागले आहेत,’ अशा शब्दांत शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला फटकारले आहे.

‘१९७१ मध्ये इंदिरा गांधींनी बांगलादेशची निर्मिती केली. तेव्हाही एवढे पोस्टर लागले नव्हते. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकाळातही सर्जिकल स्ट्राइक झाली होती,’ असं सांगतानाच ‘सर्जिकल स्ट्राइक ही तर राष्ट्रहिताची गोष्ट आहे. त्यासाठी लष्कराला सलामच केला पाहिजे,’ असे ते म्हणाले. सर्जिकल स्ट्राइक हा लष्कराच्या रणनितीचा भाग आहे. त्याबाबतचे राजकारण का केले जात आहे,’ असा सवालही त्यांनी केला.