मुंबई-पालघर लोकसभेच्या पोटनिवडणूकीत शिवसेनेचा आज पराभव झालेला आहे. शिवसेना व भाजपने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. अखेर यात भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित विजयी तर शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा पराभूत झाला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने मातोश्रीवर बैठक बोलविली असून बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत भाजप सोबत शिवसेनेची असलेली युती तुटण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान युतीबाबत काय तो निर्णय बैठकीनंतर कळणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.