भाजयुमोच्या उपोषणामुळे तहसिल प्रशासनाची वाळू वाहनांवर कारवाई

0

शिरपूर । तालूक्यातील तापी नदीपाञातुन होणारा अवैध उत्खननाची चौकशी करावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चातर्फै एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी, प्रातंधिकारी, तहसिलदार यांचाकडे करण्यात आली होती. बेकायदेशीर वाळूचा उपसा आणि वाहतुकीविरोधात भाजयुमोतर्फे शहराध्यक्ष चेतन (विक्की) चौधरी यांचासह पदाधिकारी दि17 मार्च पासुन उपोषणाला बसले होते.

गुरूवार 23 मार्च रोजी सकाळी प्रांतधिकारी नितिन गांवडे,तहसिलदार महेश शेलार यांनी उपोषणस्थळी भेट देवून चर्चा केली. लेखी मागण्या मान्य केल्याचे पत्र देवून उपोषणाची सातवा दिवसी सांगता करण्यात आली. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरींनी चर्चा केली. लेखी दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि दि 18 ते 21पर्यंत रेती उपसा पुर्णपणे बंद करण्यात आलेला होता. तसेच यापुढे रात्रीचा उपासा होणार नाही. तसेच तीन डंबरवर उप्परपिंड रेती वाहतुक करण्यावर कारवाई करण्यात आली असून रविवारी रेती उत्खनन पुर्णपणे बंद राहील याची दखल घेण्यात आलेली आहे. तशा सुचना रेती लिलावधारकांना देण्यात आलेल्या आहेत. पर्यावरण विषयक मुद्दावर तज्ञ समिती मार्फत तपासणी करण्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आला आहे.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी पो.नि.दत्ता पवार, नगरसेवक मोहन पाटील,भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी,शहराध्यक्ष तथा नगरसेवक हेमंत पाटील,जिल्हा उपाध्यक्ष मिलींद पाटील,जिल्हा चिटणीस संजय आसापुरे,चंद्रकांत पाटील,जिल्ह कोषध्यक्ष आबा धाकड,भाजपा अनु जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार.पाटील,नगर सेवक राजेंद्रसिंग गिरासे,चंदनसिंग राजपुत,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष हेमराज राजपुत,भाजपा ता सरचिटणीसदेवेंद्र देशमुख,भाजपा शहर सरचिटणीस महेंद्र पाटील,उपाध्यक्ष रोहीत शेटे, प्रशांत चौधरी, शहर चिटणीस राधेश्याम भोई,अविनाश शिंपी,रहीम खाटीक,भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख,जिल्हा चिटणीस जाकीर तेली, अरमान मिस्त्ररी, भाजपा व्यापारी आघाडी शहराध्यक्ष नंदु माळी,संदीप करंके,रविंद्र भोई ,डॉ सुनिल पानपाटील,निलेश देशमुख,हिम्मत राजपुत आदि उपस्थित होते.