भाजयुमोच्या पहिल्या शाखेचे चोपड्यात उद्घाटन

0

चोपडा । भारतीय जनता युवा मोर्चाने सरकारला एक हजार दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी दहा हजार शाखांचे उद्दिष्ट ठेवले आहे. उद्दिष्टपुर्णत्वाची सुरुवात चोपडा शहरातून करण्यात आली. भाजयुमोचे प्रदेशाध्यक्षांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चोपडा शहरातील पंकजनगर भागात जिल्ह्यातील पहिली शाखा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आली. कॅालेज कनेक्ट कार्यक्रम अंतर्गत इबीसी विद्यार्थ्यांसाठी मर्यादा वाढविली आहे. पंजाबराव देशमुख वस्तीगृह योजनेचा लाभ विद्यार्थ्याला व्हावा म्हणून प्रयत्न केले जात आहे. तसेच ’युवा महाराष्ट्र, घे भरारी कार्यक्रमातून’ युवा पदाधिकार्‍यांना संधी देण्याचा मानस भाजप सरकारचा आहे.

क्रीडापटूंना व्यासपीठ उपलब्ध करुन देणार
’खेलो इंडिया’ मधून ग्रामीण भागातील चमकत्या क्रिडा पटूंना भाजयुमो व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी यावेळी सांगितले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करुन हॅाटेल गुरुदत्त येथे भाजयुमोची आढावा बैठक पंचायत समिती सभापती आत्माराम म्हाळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यांची होती उपस्थिती
यावेळी प्रास्तविक शहराध्यक्ष तुषार पाठक व प्रभारी स्वप्नील लोकरे यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन चोसाका संचालक शशीकांत देवरे यांनी केले. प्रकाश पाटील, तुषार पाठक, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील, नगरसेवक गजेंद्र जैस्वाल, जि.प. सदस्य गजेंद्र सोनवणे, सूतगिरणी संचालक शशीकांत पाटील, माजी पं.स.सदस्य डॉ.चंद्रकांत बारेला, पंकज पाटील, रावसाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत धनगर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.