भोसरी : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकर्यांना शहराध्यक्ष नगरसेवक रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली ‘भाजयुमो’तर्फे मॅग्झीन चौक, भोसरी आणि खराळवाडी येथे रेनकोट, बिस्किट, पाणी, केळी, लाडु आदी वाटप करण्यात आले. यानंतर ‘स्वच्छ भारत अभियान’साठी खारीचा वाटा म्हणून स्वच्छता अभियान राबविले.
तसेच ‘बेटी बचाव बेटी पढाव’ चा प्रसार करण्यात आला. यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, भाजपा प्रदेश चिटणीस उमा खापरे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, प्रभाग स्विकृत समिती सदस्य विठ्ठल भोईर, वैशाली खाड्ये, सांस्कृतिक आघाडी शहराध्यक्ष धनंजय शाळीग्राम, भाजयुमो पदाधिकारी अजित कुलथे, अमित गुप्ता, सचिन राऊत, अजय भोसले, मंगेश धाडगे, दिपक नागरगोजे, पंकज शर्मा, मधुकर बच्चे, भुषण पाटील, पंकज वेंगुर्लेकर, राहुल शिंदे, सोनल वर्मा, सुमित घाटे, पराग जोशी, गणेश संभेराव, पंकज वेंगुर्लेकर, महेश कंद, गोपाल मंडल, ऋतिक चव्हाण, अमित देशमुख, सत्पाल गोयल, इंद्रमल कुसवाह, शरद फुगे, संग्राम गुळवे व इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.