पाचोरा । पाचोरा तालुका भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात पंचायत समिती सभापती तथा तालुकाध्यक्ष सुभाष पाटील यांच्या अध्यक्षतेत घेतलेल्या बैठकीत भाजयुमोच्या तालुकाध्यक्षपदी किशोर नरेराव तर शहराध्यक्षपदी राजेंद्र कुमावत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. बैठकीत भाजयुमोच्या तालुका व शहराध्यक्षांची निवड करण्यात आली.
निवडीबद्दल यांनी केले अभिनंदन
पदाधिकार्यांच्या निवडीबद्दल जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, शहराध्यक्ष नंदुबापु सोमवंशी, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, न.पा. गटनेते अमोल शिंदे यांनी सत्कार व सन्मान केला. तसेच नवनियुक्त तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्या निवडीबद्दल राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, खासदार ए.टी.नाना पाटील, खा. रक्षाताई खडसे, संघटनमंत्री किशोर काळकर, जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील आदींनी अभिनंदन केले आहे. या बैठकीत पंचायत समिती सदस्य तथा तालुका सरचिटणीस बन्सीलाल पाटील, प्रदीप पाटील, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष गोविंद शेलारसह तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.