भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातून मंगलपोत लांबवली : पिंप्राळ्यातील घटना

Mangalpot was pulled from the neck of a woman who had come to buy vegetables: incident in Pimprala जळगाव : बाजारात भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातून 50 हजार रुपये किंमतीची मंगलपो चोरट्यांनी लांबवली. ही घटना शहरातील पिंप्राळा परीसरातील बुधवारच्या आठवडे बाजारात घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू
जळगाव शहरातील भिकमचंद जैन नगराजवळील वाघोदे नगरातील कल्पना संजय पाटील (30) या बुधवारी भाजीपाला खरेदी करण्यााठी पिंप्राळ्यातील आठवडे बाजारात आल्या असता सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांच्या गळ्यातील 25 ग्रॅम वजनाची व 50 हजार रुपये किंमतीची मंगलपोत अज्ञात चोरट्याने लांबवली. कल्पना पाटील यांनी तातडीने रामानंदनगर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक राजेश चव्हाण करीत आहेत.