शहादा। कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भाजीपाल्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा निर्णय शेतकर्यांच्या दृष्टीने हिताचा असून शेतकर्यांच्या याला पाठींबा आहे. मात्र प्रक्रीया लवकर पूर्ण केल्यास शेतकर्यांना न्याय मिळणार आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी गिरिष पाटील यांनी दिली. शेतकर्यांच्या मालाला किमत बाजार भाव मिळाला पाहिजे. आतापर्यंत शेतकर्यांची कुचंबणा होत आली आहे. रात्रंदिवस मेहनत करणारा शेतकरी सातत्याने दुर्लक्षित राहिला आहे. त्याला न्याय मिळणे अपेक्षित आहे.
शेतकर्यांची लूट थांबण्यास होणार मदत
शहादा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भाजी पाल्याचा लिलाव सुरु झाल्यास शेतकर्यांची लुट थांबून दलाली करणार्यांना पायबंद लागेल. कोणत्याही कमिशन एजंटशी शेतकर्यांच्या संबंध न येता शेतकरी स्वतः आपला भाजीपाला विक्री करेल, त्यांचे पैसा वाया जाणार नाही शेतकर्यांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार होईल. कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ कोणाचे आहे हा भाग महत्वाच्यानसुन शेतकरी हा घटक महत्वाच्या आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भाजीपाल्याचा लिलाव सुरु झाल्यास भविष्यात जिल्ह्यात सर्वात जास्त भाजीपाल्याचे उत्पन्न शेतकरी काढतील त्यांना हक्काचे बाजारपेठ मिळेल अशी प्रतिक्रिया शेतकरी गिरीश पाटील, दत्तात्रय सोमजी पाटील , यशवंत तुकाराम पाटील यांनी दिली. याला शेतकरी संघटनेचा देखील पाठींबा आहे