भाजीपाला विक्रेत्याची भुसावळात आत्महत्या

0

भुसावळ- शहरातील गंगाराम प्लॉट भागातील रहिवासी असलेल्या भाजीपाला विक्रेत्याने काहीतरी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. कैलास शिवाजी चौधरी (46, गंगाराम प्लॉट, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. वीज बिल भरण्यासाठी चौधरी सोमवारी दुपारी घरातून बाहेर पडले होते मात्र रात्री ते घरी न आल्याने त्यांचा शोध सुरू होता. लोणारी मंगल कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे रूळाजवळील एका पडीत शेतात त्यांचा मृतदेह आढळला. रात्रीच त्यांनी विष प्राशन केल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी मनिषा, मुलगा व मुलगी असा परीवार आहे. घटनेची माहिती कळताच शहर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सारीका खैरनार, वसंत लिंगायत, विनोद तडवी, भूषण चौधरी यांनी धाव घेतली. योगेश शरद चौधरी यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.