भाजी मार्केटमधून व्यापार्‍याचे 35 हजार लांबविले

0

भाजी मार्केटमधून व्यापार्‍याचे 35 हजार लांबविले
शहादा :
शहरातील भाजी मार्केटमधून व्यापार्‍याचे 35 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले आहे. मफतलाल वसराज कोठारी (रा.अमळनेर, जि.जळगाव) यांचे महत्त्वाचे काम असल्याने ते शहरात आले होते. त्यांच्याजवळ असलेल्या कापडी पिशवीत ठेवलेले 35 हजार 283 रुपये रोख भाजी मार्केटमधून चोरट्याने चोरुन नेले. याबाबत शहादा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोना.गावित करीत आहेत.