भाटनगर परिसरातील इमारतीची डागडुजी करून द्यावी

0

शिव व्यापारी संघाची महापालिकेकडे मागणी

पिंपरी : भाटनगर-पिंपरी परिसरातील इमारतींची डागडुजी करुन तेथील रहिवाशांना न्याय द्यावा अशी मागणी, शिवव्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांनी आयुक्तांकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे. यावेळी शिवशाही व्यापारी संघ प्रदेश सचिव गणेश आहेर, प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले, शिवशाही व्यापारी संघ पिंपरी विधानसभा अध्यक्ष सारिका तामचिकर, नम्रता भाट, निशा भाट, गीता भाट, बेबी भाट, अमृता अभंगे आदी उपस्थित होते.

अन्यथा आंदोलनाचा करणार
शिवशाही व्यापारी संघातर्फे दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून प्रभाग क्रमांक 19 भाटनगर-बौध्दनगर मधील इमारतींच्या स्लॅबची परिस्थिती गंभीर झाली आहे. स्लॅबचे छोटे-छोटे तुकडे अंगावर पडतात. त्याचप्रमाणे या स्लॅबमधून पावसाच्या पाण्याची गळती होत आहे. आयुक्तांनी या प्रश्‍नात तातडीने गांभीर्याने लक्ष घालून तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करून इमारतीच्या छतावर डांबरपट्या बसविण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा भर पावसाळ्यात आम्हाला तेथील रहिवाशांना न्याय देण्यासाठी आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.