मुख्य अभियत्यांना पुणे येथे निवेदन सादर
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील भिमा नदीवरील भाटनिमगाव येथे असलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ( मंगळवारी) पुणे येथे जलसंपदा मुख्य अभियंता विलासराव रजपूत यांचेकडे केली. याप्रसंगी बंधारा दुरूस्तीच्या मागणीचे निवेदन वडापुरी,अवसरी व सुरवड येथिल पाणी वापर संस्थांच्या वतीने मुख्य अभियंत्यांना देण्यात आले.यावेळी पाटील यांनी बंधारा दुरूस्ती संदर्भात मुख्य अभियंता व इतर अधिकार्यांशी चर्चा केली.
भिमा नदीवरील भाटनिमगा बंधार्याच्या 104 गाळयांपैकी 25 गाळे हे नदीपात्राच्या खोलीपेंक्षा 1.5 मीटर खोल आहेत. परिणामी, बंधार्यांमध्ये ढापे टाकल्याशिवाय कसलेच पाणी आडत नाही. त्यामुळे बंधार्याची दुरूस्ती तातडीने होणे गरजेचे असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बंधार्याच्या दुरूस्तीसाठी तातडीने कार्यवाही केली जाईल ,अशी ग्वाही यावेळी मुख्य अभियंता रजपूत यांनी दिली.
चार हजार एकर क्षेत्र अवलंबून
भाटनिमगाव बंधारा उजनी धरणापासून खालील बाजूला सुमारे 5 कि.मी.अंतरावरती आहे.या बंधार्याच्या पाण्यावरती वडापुरी येथिल श्रीनाथ पाणी वापर, सुरवड येथिल भैरवनाथ पाणी वापर व अवसरी येथिल अवसरी पाणी वापर या तीन मोठ्या सहकारी पाणी वापर संस्थांचे सुमारे 4 हजार एकर क्षेंत्र अवलंबून आहे. तसेच बाभुळगाव, गलांडवाडी नं.2, भाटनिमगाव, वडापुरी, अवसरी, सुरवड, बेडशिंगे, भांडगाव,रांझणी, रूई, आलेगाव या गांवांमधील शेती अवलंबून आहे.पाटील यांनी सांगितले की, सन 1999 मध्ये नंदलाल यांचेकडून खास बाब म्हणून मंजूरी घेऊन हा कोल्हापूर पध्दतीचा बंधारा आपण बांधला. त्यामुळे 12 गावांमधील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. या बंधार्याच्या दुरूस्तीसाठी माझा पाठपुरावा सुरूच राहील,
जलसंपदा मुख्य अभियंत्यांना निवेदन देताना हर्षवर्धन पाटील यांचेसह ज्ञानदेव मगर, महादेव गारकवाड सुर्यकांत फडतरे, रावसाहेब घोगरे,दादासाहेब जगताप ,किशोर देवकर,सुदाम मोरे,राजेप्रताप शिंदे,दत्तात्रय मोरे,आदेश शिंदे,नवनाथ जाधव,दिनेश शिंदे, विठ्ठल शिंदे, शांताराम सावंत आदींसह सुरवड, वडापुरी, अवसरी येथील शेतकरी बांधव उपस्थित होते.