भाडणे शिवारात 2 लाखांची देशी-विदेशी दारु जप्त

0

साक्री। राष्ट्रीय महामार्गालगत भाडणे शिवारात असलेल्या अन्नु सिरॅमिक येथील गोडावून मध्ये देशी-विदेशी दारू आढळून आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभाग व साक्री पोलीसांनी संयुक्त कारवाई करत धाड टाकली. या कारवाईत 2 लाख 65 हजार 920 रूपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली.

साक्री शहरातील अन्न पार्क हॉटेलच्या देशी विदेशी साठा त्यांच्या सिरॅमिकच्या गोडावूनमध्ये ठेवले असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाल मिळाली होती. या आधारे साक्री पोलीसांच्या मदतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज सकाळी 11 वाजता धाड टाकली. याप्रसंगी राज्य उत्पादन शुल्क विभागाने निरीक्षक डी. एफ. चकोर, साक्री पोलीस निरीक्षक आर. एस. पाटील, डी. के. क्षिरसागार, एन. एम. सोनवणे, संजय कुटे, तारासिंग पावारा, एल. जी. वाघ, जितेंद्र फुलपगारे, केतन जाधव, रविंद्र देसले, भालचंद्र वाघ आदींच्या पथकाने कारवाई केली.