पिंपरी : चोरून केबल वापरतो, म्हणून भाडेकरुला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी पित्यासहीत दोघांना न्यायालयाने दोषी ठरवले. तिघांना एक वर्षाची साधी कैद आणि एक हजार रुपये दंड ठोठावला आहे. तो दंड फिर्यादी यांना देण्याचे आदेश पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. पी. फडणीस यांनी दिला आहे.
नरेंद्र बहादूर चव्हाण (वय 40) तसेच, त्याचे दोन मुले अनुग्रह चव्हाण (वय 23) आणि अंकुश चव्हाण (वय 22, सर्व रा. सुदर्शनगर, चिखली) अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी लक्ष्मण राजपूत यांनी फिर्याद दिली होती.
फिर्यादीसह पत्नीला मारहाण
राजपूत हे चव्हाण यांच्या खोलीमध्ये भाड्याने राहत होते. राजपूत हे चोरून केबल वापराच्या संशयावरून दोघांमध्ये वाद झाला. 3 जानेवारी 2015 ला रात्री आठच्या सुमारास राग मनात धरून वरील तिघेजण राजपूत यांच्या खोलीत शिरले. ’तू आमची खोली रिकामी कर’, असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. या भांडणात फिर्यादी यांची पत्नीमध्ये आली असता, त्यांनाही मारहाण केली. तसेच, फिर्यादी राजपूत यांच्या डोक्यात कपडे धुण्याची लाकडी बॅट मारली. तिघांनी घरातील सामानाची तोडफोड करून नुकसान केले होते. या प्रकरणी पिंपरी न्यायालयाने तिघा आरोपींना दोषी ठरवून घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी 1 वर्षे साधी कैद आणि एक हजार दंड तसेच, दंड न भरल्यास साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सहाय्यक सरकारी अभियोक्ता भूषण पाटील यांनी साक्षीदार तपासले. सहायक पोलीस निरीक्षक सागर पानमंद याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. बी. शेरे, के. एस. शेळके, आर. व्ही. मते यांनी तपास केला.