जळगाव । घरेलु कामगारांनी पंतप्रधान आवास योजनेअतंर्गत कौतीक नगर येथील भाडेकरूंनी भोईटे शाळेमध्ये घरकुलचा फॉर्म भरून दिला आहे. फॉर्म भरल्याचा सबळ पुरावा मिळाला नसल्याची तक्रार या महिलांनी महापालिकेत बांधकाम विभागात केली. गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून घरकुलचे फॉर्म भरून दिले आहेत. मात्र सबळ पोच नसल्याने त्यांची घरकुल योजनेत घर मिळेल किंवा नाही याबाबत काही एक कळू शकत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. लवकरात लवकर त्यांना सबळ पोच मिळण्याची मागणी केली.
या महिलांनी बांधकाम अभियंता सोनगीरे यांना भेटून घरकुलाची पावती देण्याची मागणी केली. याप्रसंगी उर्मिला सोनार, अनिता चौधरी, सरला कुंभार, अनिता तायडे, अंजली सपकाळे, मिनाबाई लोहार, रेखाबाई सुरलके, अर्चना भावसार, द्वारकाबाई खंडारे, मुक्ताबाई सुरळकर, निलीमा भोई, आशा वळते, बेबीबाई तायडे, उषा वारूळे, रत्नाबाई मोची आदी उपस्थित होते.