भाडेकरूंना मालकी हक्क देण्यासंबंधी समिती गठित करणार- रवींद्र वायकर

0

मुंबई | मुंबई शहर व मुंबई उपनगर क्षेत्रात अनेक वर्षांपासून राहत असलेल्या भाडेकरूंना घराचा मालकी हक्क देण्यासंबंधी शासनामार्फत महिन्याभरात समिती गठित करण्यात येईल. यासंबंधी कायदा करण्यासाठी शासन उचित निर्णय घेईल, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.

सदस्य मंगलप्रभात लोढा यांनी याबाबतची लक्षवेधी मांडली होती. भाडेकरूंना घरमालकी हक्क देण्याबाबत महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम १९९९ मध्ये तरतूद नसल्याने भाडेकरू देत असलेल्या भाड्याच्या १०० पट रक्कम शासन दरबारी जमा करण्यासंबंधी मुंबईतील स्थानिक लोकप्रतिनिधींशी बैठक घेण्यात येईल. तसेच न्यायालयात हे प्रकरण जलदगतीने चालविण्यासाठी वकिलांची नेमणूक करण्यात येईल. या लक्षवेधी चर्चेत सदस्य सर्वश्री आशिष शेलार, राज पुरोहित, अतुल भातखळकर, सुनील शिंदे यांनी सहभाग घेतला.