भाडेतत्वावर गाड्यांसाठी 1 कोटींचा खर्च

0

पुणे । महापालिकेतल्या विविध विभागात टुरिस्ट परवाना असलेल्या चारचाकी गाड्या भाडेतत्वावर घेण्यासाठी 1 कोटी 10 लाख रुपयांचा प्रस्ताव प्रशासन येत्या बुधवारी (दि. 16) होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवणार आहे. महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन, पाणीपुरवठा, विविध क्षेत्रीय कार्यालये आणि इतर विभागांना शासकीय कामासाठी मारुती इको या संवर्गातील वाहने भाडे तत्वावर घेतली जातात. त्याकरीता राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेच्या छाननीनंतर चिनू ट्रॅव्हल या निविदाधारकाच्या निविदेचा प्रस्ताव प्रशासनाने मान्यतेसाठी ठेवला आहे.

यामध्ये एअर कंडिशनची सुविधा नसलेली एक गाडी 12 तासासाठी 1300 रुपये तर 24 तासासाठी 2000 रुपये दरात घेण्यास प्रशासनाने तयारी दाखवली आहे. येत्या बुधवारी होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर निर्णय घेतला जाईल.