भाड्याच्या रकमेचा अपहार केल्याने गुन्हा दाखल

0

जळगाव। वाहतुकीच्या भाड्यापोटी मिळालेली रक्कम कंपनीच्या बॅँक खात्यात न भरता रक्कमेचा अपहार करून फसवणुक केल्याप्रकरणी दाखल गुन्हयाच्या तपासातून एमआयडीसी पोलीसांनी एका संशयीतास ताब्यात घेतले. एम.आय.डी.सी.परिसरातील ऑटोनगरातील दत्तात्रय बिल्डींग येथील अश्‍विनी लॉजीस्टीक या कंपनीचे कार्यालयत आहे. येथे साधुराम खटकड हे कार्यरत होते.

डीएचडीसी कंपनीकडून ट्रान्सपोर्टच्या भाड्याची रक्कम रूपये 2 लाख 3 हजार 600 रुपये खटकड यांना प्राप्त झाली. ही रक्कम कंपनीच्या बॅँक खात्यात भरण्याची जबाबदारी असतांना खटकड यांनी ती रक्कम स्वत:कडे राखून ठेवली. फसवणुक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर दिपक समुद्रसिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला खडकड यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासधिकरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी गुन्हयाच्या तपासातून संशयीत साधुराम खटकड याला अटक केली आहे.