जळगाव। कल्याण येथून अकोला जाण्यासाठी एकाने इन्होव्हा कार भाड्याने घेतली होती. मात्र, जळगावातील विटनेजर गावाजवळ भामट्या प्रवाश्याने चालकाला मोबाईल पडल्याचा बनाव करून खाली उतरवून स्वत: कार घेवून पसार झाल्याची घटना आहे. याप्रकरणी कारचालकाने दिलेल्या फिर्यादीवरून त्या चोरट्या प्रवाश्याविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अशाच प्रकाराची घटना ही विटनेर गावाजवळ तिसर्यांदा घडली आहे. शहरात दूचाकीचोरीनंतर कार चोरींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
कल्याण येथून कल्पेश वर्मा (पूर्ण नाव माहित नाही) याने अकोला जाण्यासाठी भाड्याने इन्होव्हा कार (क्रं.एमएच.12.एफके.5275) केली. यानंतर जळगावात मंगळवारी आल्यानंतर पहाटे 5 वाजेच्या सुमारास विटनेर गावाजवळील म्हसावद-नेरी रस्त्यावर कल्पेश याने लघुशंकेसाठी कार थांबवली. लंघूशंकेनंतर कल्पेश हा कारमध्ये बसला. यानंतर खिडकीतून हात धुण्याचा बहाणा करून हातातील मोबाईल खाली पडल्याचे चालक निसार शब्बीर शेख यांना सांगितले.
कारसह दोन मोबाईल घेऊन प्रवाशाचा पोबारा
प्रवाश्याचा मोबाईल पडला यामुळे निसार हे कारखाली उतरून मोबाईल शोधू लागले. त्यावेळेतच कारमध्ये चालक नसल्याचे संधी साधून कल्पेश याने मागिल सिटावरू ड्रायव्हर साईडला येवून कार घेवून पसार झाला. यावेळी निसार यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा-ओरडा केली. मात्र, भामटा कार घेवून पसार झाला. यानंतर निसार यांनी सकाळीच एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत फिर्याद नोंदवली. तसेच अज्ञात चोरट्याने चार लाखांची कार, सहा हजार रुपयांचे दोन मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणीचा पुढील तपास एन.बी.सुर्यवंशी करीत आहेत.