भातखंडे परीसरातील पिके धोक्यात; शेतकरी हवालदिल

0

भातखंडे । भातखंडे व परिसरातील उत्राण, तळई, गिरड, अंजनविहिरे, मांडकी, बांबरुड, पिंपळगाव, पिंपरखेडसह परिसरात कापूस, मका, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, हे पीक बर्‍यापैकी असले तरी पण या परिसरात गेल्या वीस ते बावीस दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हा पुरता संकटात सापडला आहे. पावसाची अशीच परिस्थित राहिली आणि पाऊस नसल्याने मूग, उडीद ही पिके तोंडी आलेला घास वाया जाईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. तीच गत कापूस व अन्य पिकांची झाली आहे. अगोदरच शेतकरी हा पीक कर्ज व अन्य कर्जाच्या ओझ्याखाली पार दबला गेला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी अत्यंत भयभीत झाला आहे. दोन तीन दिवसांत पाऊस पडला नाही, तर मात्र ह्या वर्षी सरासरी हेक्टरी होणारे उत्पादन कमालीचे घटणार आहे.