भातखंडे । भातखंडे येथील पाटील किसान शिक्षण संस्थेच्या या वर्षाचे अंतर्गत मूल्यमापन नुकतेच भातखंडे येथे अकस्मात येऊन तपासणी सुरू केली अशीच तपासणी संस्थेच्या इतर गिरड, अंतुर्ली, अंजनविहीरे, आमडदे, भडगाव, कोळगाव, महिंदळे, वडजी, पळासखेडे या शाखांची देखील अशीच तपासणी होणार असून या कामी संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील, लाडकूबाई प्राथमिक मंदीराचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे, डीटीएड कॉलेजचे प्राचार्य श्री.माळी हे करीत असून यात कार्यालयीन कामकाज कार्यालय कामकाजातील ऑडिट रिपोर्ट, कीर्द खतावणी व विविध कार्यालयातील दस्ताऐवज तपासणी, वार्षिक नियोजन घटक नियोजन, सांस्कृतिक कार्यक्रम समिती, विज्ञान समिती क्रीडा समिती, स्पर्धा परीक्षा समिती, परीक्षा समिती, सहल समिती, भोजन व्यवस्थापन समिती, स्काऊट गाईड समिती, शिक्षक गणवेश, बायोमेट्रिक रेकॉर्ड, शिक्षकांचा ड्रेस कोड, शिक्षक टाचण, शिक्षक हजेरी, प्रयोगशाळा रजिस्टर, ग्रंथालय रजिस्टर, निकाल पत्रके, बातम्यांचे कात्रणे, संस्था व व्यवस्थापन समितीअहवाल, खेळ साहित्य रजिस्टर, ग्रंथालय रजिस्टर, शालेय परिसर स्वच्छता, शाळा सिद्धि कामकाज, शैक्षणिक साधना बनवलेली व त्याचा अध्यापनात प्रत्यक्ष वापर कसा केला जातो ते पाहिले.
डिजीटल क्लासरुमची पाहणी
डिजीटल क्लासरुम देखील पाहिला जात आहे. मराठी हिंदी इंग्रजी च्या कविता प्रत्यक्ष चाली लावून घेतल्या जातात ते साथ संगीता ऐकून पाहिल्यात. प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्यांचे वाचन लेखन कौशल्ये जाणून घेतले जात आहे. तसेच गृहपाठ, निबंध व प्रयोग वही स्काऊट गाईड समाजसेवा कार्यानुभव इत्यादी विषयांचे प्रत्यक्ष कामकाज पाहिले जात आहे यामागचा हेतू असा की जेणेकरून स्पर्धेच्या युगामध्ये संस्था अंतर्गत शाळा ह्या टिकल्या पाहिजेत गुणवत्ताही टिकली पाहिजे. गुणवत्तावाढीसाठी दरवर्षी संस्था अंतर्गत शाळा तपासणी केली जात असते. संस्थेच्या ह्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.