भातखंडे। येथील भातखंडे माध्यमिक विद्यालयात डिजिटल क्लासचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष अशोक पाटील, सदस्य सुरेश पाटील, अजबराव पाटील, अरूण पाटील, सुभाष पाटील तर गावातील पंडित पाटील, अर्जुन पाटील, गोरख पाटील, कांतीलाल मोरे, रवींद्र पवार, भैय्या जाधव आदींची उपस्थिती होती. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जी.जे. पाटील यांनी प्रास्ताविक करून डिजिटल क्लासरूमचे महत्त्व विषद केले.
250 वह्यांचे वाटप
प्राथमिक शिक्षक समाधान बडगुजर यांनी त्यांच्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ पाचवीच्या विद्यार्थ्यांना 250 वह्या मोफत देण्यात आल्या. यावेळी डिजिटल क्लासचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील करण्यात आले. यावेळी शाळेतील, आय.जे.पाटील, एन.यु. देसले, बी.एन.पाटील, एस.बी. भोसले, आर.यू.राऊळ, एस.एन.सोनवणे, ए.एस.पाटील, एस.जे.सैंदाणे, संदीप पाटील, नित्यानंद पाटील, संजय पाटील, सोपान पाटील, गुलाब पाटील यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील जेष्ठ शिक्षक बी.एन.पाटील यांनी केले.