रोहा । महादेवखार ता. रोहा या विभागात यावर्षी चांगल्या पर्जन्यमानामुळे भाताचे पिक चांगले आले आहे. परंतु, मागील 4 दिवसांपासून येथील भात पिकावर करपा व खोड किडा या रोगांचे आक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. सध्या भाताचे पीक लोंब्या येण्याच्या अवस्थेत असून गरवा व निमगरवा जातीचे भातपीक वाढीच्या अवस्थेत असताना करपा रोगामुळे भातशेती पूर्णपणे सुकून जात आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी भातपिकावर लालसर व पांढर्या रंगाची आढळून येत आहेत.
कृषीसेविका मिनल शिंदे, कृषी मित्र संकेत जोशी, ग्रा. प. सदस्य गोवर्धन कांडणेकर, निलम वारगे, रघुनाथ कांबळे, चंद्रकांत गायकर, लक्ष्मण भुरे, हिराजी कांडणेकर, भालचंद्र मोरे, मोहन कांबळे यांच्यासमवेत भातशेतीची पाहणी करण्यात आली. कार्बन डेन्झीम 50 टक्के 10 ग्रम 10 लीटर पाण्यात मिसळून दर 15 दिवसांनी फवारण्यात यावे असे शेतकर्यांना सांगण्यात आले आहे.