भुसावळ- जळगाव ते भादली दरम्यान असलेले रेल्वे गेट क्रमांक 150 रेल्वे रूळ दुरुस्तीच्या कामासाठी 23 व 24 रोजी दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे. रेल्वे रूळाखालील खडी बदलण्यासाठी तसेच आवश्यक त्या ठिकाणी रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनातर्फे या काळात करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी रेल्वे गेट बंद राहणार असल्याबाबत नोंद घ्यावी तसेच पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन भुसावळ रेल्वे प्रशासनाने केले आहे.