भुसावळ- भादली, ता.जळगाव येथील इसमाचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेपूर्वी गोदावरील महाविद्यालयासमोर घडली. दीपक खंडू नारखेडे (45, रा.भादली, ता.जळगाव) असे मयताचे नाव आहे. नारखेडे यांचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला की रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू झाला याबाबत माहिती कळू शकली नाही. भादली स्टेशन अधीक्षक यांनी खबर दिल्यावरून नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास उपनिरीक्षक गणेश हिवरकर करीत आहेत.