भादलीच्या शेतकर्‍याला दोघांकडून मारहाण

जळगाव : तालुक्यातील भादली येथील कुंभारवाडा पक्षहसरात दोन जणांनी शेतकरी तरुणाला किरकोळ कारणावरून मारहाण करीत डोके फोडण्यात आले. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

किरकोळ कारणावरून मारहाण
भादली येथे गोकुळ शरद जंगले (30) हा तरुण कुटुंबीयांसोबत वास्तव्यास आहे. मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास गोकुळ जंगले हा गावातील कुंभारवाडा येथील दुकानावर पत्नीसाठी स्प्राईटची बाटली घेण्यासाठी गेला. यावेळी गावातीलच नामदेव पांडुरंग कोळी याने दारूच्या नशेत माझ्याकडे का पाहतो या कारणावरून गोकुळ जंगले यास चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. याचवेळी नामदेव कोळी याचा मुलगा राहुल कोळी याने त्याच्या हातातील कड्याने गोकुळ जंगले याच्या डोक्यावर मारहाण केली. यात गोकुळ जंगले याच्या डोक्याला दुखापत झाली. गोकुळ जंगले यांनी दिलेल्या तक्रारीवरून नामदेव पांडुरंग कोळी व राहुल नामदेव कोळी (दोन्ही रा.भादली )या दोघांविरूध्द नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार संजय जाधव हे करीत आहेत.