एकाच कुटुंबातील चौघांची क्रूर हत्या

0

जळगाव- जळगाव तालुक्यातील भादली बुद्रूक येथील एकाच कुटूंबातील चौघांची धारधार शस्त्राने हत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. निर्दयी हल्लेखारांनी मात्र अतिशय क्रुरपणे सर्वांच्या डोक्यात शस्त्र घातलून हत्या केल्याचे दिसून आले. या हत्याकांडाने संपूर्ण तालुका हादरला असल्याची स्थिती आहे. शेतजमीन विक्रीच्या वादातुन ही घटना घडली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान चौघांचे मृतदेह इनकॅमेरा शवविच्छेदनासाठी धुळे येथे पाठविण्यात आले आहे. अद्याप खुनाचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत कुटुंबियामागे प्रदीपच्या तीन बहिणी व काका चुलते असा परिवार आहे. प्रदीप सुरेश भोळे (वय-45), पत्नी संगीता सुरेश भोळे (वय-35), मुलगी दिव्या प्रदीप भोळे (वय-8), तर मुलगा चेतन प्रदीप भोळे (वय-5) असे या हत्या झालेल्यांची नावे आहेत. तसेच सकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अपर पोलिस अधीक्षका मोक्षदा पाटील यांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण परिसराची पाहणी करत माहिती घेतली. नंतर त्याठिकाणी ठसे तज्ञ व श्‍वान पथकाने देखील पाचारण करण्यात आले होते.

रक्ताच्या थारोळ्यात पडले कुटूंबिय
प्रदिप सुरेश भोळे हे पत्नी संगिता मुलगी दिव्या व मुलगा चेतन यांच्या सोबत भादली येथील भोळे वाडा येथे पार्टेशनच्या घरात राहत होते. तर प्रदीप भोळे हे शेतकरी व हॉटेलचे उत्तम कारागीर होते. दरम्यान, सोमवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास प्रदीप भोळे यांच्या घरात सकाळी वारंवार मोबाईलची रिंग वाजत असतानाही कोणीही कॉल रिसीव्ह करीत नसल्याचे पाहून घरासमोर राहणार्‍या त्यांच्या चुलत काकू अलका भोळे या त्यांना आवाज देण्यासाठी गेल्या असता घरातून कोणीही प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे त्यांनी दरवाजा ढकलून पाहिला असता प्रदीप भोळे हे खाली तर पत्नी व दोन्ही मुले हे पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. ही घटना पाहताच त्यांनी जोरदार किंचाळी मारली. यानंतर शेजारी-पाजारी राहणार्‍या लोकांना घटना कळताच त्यांनी भोळे यांच्या घराकडे धाव घेतली. नंतर काही क्षणातच गावभर त्याची चर्चा झाल्याने अख्खे गावच घटनास्थळावर लोटले होते.

पोलिसांचा ताफा घटनास्थळी
भादलीत एकाच कुटूंबियातील चौघांची निघृण हत्या झाल्याची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक राहूल वाघ, वासुदेव मराठे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, भुसावळचे सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल, सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे आदी अधिकार्‍यांचा ताफाही दाखल झाला. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनाही यावेळी पाचारण करण्यात आले होते. पोलिस अधीक्षक डॉ. सुपेकर यांनी संपूर्ण घराची पाहणी करत घटनेची माहिती घेतली. त्यांना घरात उघडे कपाट तसेच भाळे कुटूंबियांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह तसेच खोलीत पडलेले धान्य पडलेले दिसून आले. यानंतर त्यांनी घटनास्थळाच्या आजू-बाजुच्या परिसराची पाहणी केली. यानंतर नशिराबाद पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.

हॉटेल व घरबांधकामसाठी विकले शेत
प्रदीप सुरेश भोळे हे शेतकरी व हॉटेलचे उत्तम कारागीर होते. त्यांच्याकडे भोलाणे शिवारात तीन बिघे कोरडवाहू शेती होती. प्रदिप यांनी घरबांधकाम व स्वत:ची हॉटेल सुरु करण्यासाठी गावातील महेश मोतीराम पाटील यांना चौदा लाख रुपयात शेती विकली होती. काही दिवसापूर्वीच त्याची सौदापावती झाली होती. बयाना म्हणून पाटील यांनी भोळे यांना 50 हजार रुपयांचा धनादेश व रोख 35 हजार रुपये तीन-चार टप्प्यात दिले होते. रविवारीही पाच हजार रुपये दिले होते. पैशाच्या वादातून किंवा व्यवहाराचा या घटनेशी संबंध आहे का? याची चौकशी पोलीस करीत आहेत. दरम्यान,

सोमवारी होते हॉटेलचे उद्घाटन
प्रदिप भोळे यांनी भोलाणे शिवारातील तिन बिघे शेती विकून घर बांधकामसोबतच श्रध्दा नामक ही नवीन हॉटेल सुरू करणार होते. महेश पाटील यांना शेत विकल्यानंतर त्यांना काही रक्कम मिळाली होती. त्याचबरोबर शेती विकून आलेल्या बयाणा रक्कमेतून त्याच्या कर्ज सुध्दा फेडले होते. तसेच गावातील ग्रामपंचायत समोरील विठ्ठल मंदिराजवळील संकुलनात दुकान घेतले होते. त्याची दोन ते तीन दिवसापुर्वी साफसफाई सुध्दा करण्यात आली होती. सोमवारी20 मार्च रोजी या हॉटेलचे उदघाटन करणार होता. तो गावात स्वत:चा व्यवसाय सुरू करणार होता. त्यापुर्वी रविवारी 19 मार्चच्या रात्री 12 वाजेनंतर सकाळी 5 वाजे दरम्यान अज्ञात हल्लेखारांनी त्यांच्यावर हल्ला करून अख्खे कुटूंबच संपवल्याने त्यांचे हॉटले सुरू करण्याचे तसेच घर बांधकामाचे स्वप्न अधुरेच राहिले.

प्रदिप उत्कृष्ट कारागिर
जळगाव तालुक्यातील 20 ते 25 किलोमीटर अंतरावर अलेले भादली हे गाव या ठिकाणी रेल्वेस्टेशन आहे. गाव तसे सुखी समुध्दी आहे. मात्र या गावात भोळे वाड्यात राहणारे प्रदिप सुरेश भोळे हा आपल्या कुटूबासह एका पार्टटेन्शनच्या घरात राहत होता. घराचा उदारनिर्वाह मुख्यत: त्याच्या हॉटेल कामातून चालत असे तो एक उत्कृष्ट स्वयंपाकी होता. त्याचबरोबर प्रदिप याचा मनमिळावऊ स्वभाव असल्याने त्याचा कोणाशीही वाद नव्हते. त्यामुळे त्याला व त्याच्या कामाला चांगला वाव होता. मात्र, रविवारी मध्यरात्री त्याच्या संपुर्ण कुटूंबाचा खुन करण्यात आला. याबाबत नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हत्यमागे अन्य कारणाचा संशय
जमीन खरेदीच्या बदल्यात 85 हजार रूपये प्रदीपला देण्यात आले होते. मात्र त्याने ही रक्कम खर्चही केली होती. यासह उर्वरित लाखोची रक्कम ती अद्याप दिली नसल्याने प्रदीपच्या घरात फार मोठी रोकडही नव्हती, असेही जवळच्या नातलगांनी सांगितले. यासह राहत्या घराची स्थितीही अत्यंत दयनीय असल्याने केवळ पैशांच्या चोरीसाठी या चौघांची हत्या झाली नसावी, या मागे अन्य दुसरे कारण असल्याची संशयही व्यक्त केला जात आहे. दरम्यान प्रदीप हा हॉटेलमधील चांगला आचारी होता. शहरातील काही हॉटेलमध्येही त्याने काम केले होते, यामुळे त्याने स्वताचे हॉटेल सुरू करण्यासाठी शेत विकण्याचा सौदा केला होता. पत्नीचे माहेर जालना येथील होते. प्रदीपचे कुणाशी वैर नव्हते, स्वभावही चांगला होता, यामुळे या घटनेमागे नेमके कारण काय असेल याबाबतची चर्चाही भादली गावात होती. दरम्यान प्रदीप सोबत काम करणारा कर्मचारी अशोक मुंजोबा शेळके (वय 55 इस्लामपुरा जळगाव) हा हॉटेलातच अडकुन होता. चाव्या या प्रदीपकडे होत्या. दरम्यान दोघांनी शनिवारी दिवसभर हॉटेलचे काम केले होते. घटनेनंतर पोलिसांनी कुलुप तोडुन कर्मचार्‍यास बाहेर काढले. पोलिसांकडुन दिवसभर नातलगांसह ग्रामस्थांच्या चौकशीचे काम सुरू होते.

बहिण, अनिता राजश्री झाले सुन्न
प्रदीप हा एकुलता असून आई वडील वारलेले आहेत. तर तीन बहिणींपैकी एक अनिता ही कडगावला तर राजश्री आसोदा येथे तर एक बहिण साळवा येथे राहते. घटनेच्या काही वेळातच आसोदा व कडगावातील बहिणी घटनास्थळी दाखल झाल्या. घरातील स्थिती पाहुन त्या एकदम सुन्न झाल्या. यावेळी काय करावे काहीच सुचत नसल्याने त्या एका जागेवर स्तब्ध होत्या. घटनेनंतर गावासह पंचक्रोशीतील नागरिकांनी एकच गर्दी केली. घटनेनंतर जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अप्पर पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी भेट देवून पुढील कार्यवाहीच्या सुचना दिल्या. यासह ठसे तज्ञांनीही पाहणी करून ठसे घेतले.