28 वर्षीय तरुणाचा खून ? : भादलीजवळ आढळला शेतात मृतदेह

नशिराबाद : जवळच असलेल्या भादली गावातील 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह कडगाव रस्त्यावरील पाटचारीजवळ असलेल्या शेतात बुधवारी सकाळी आढळल्याने परीसरात खळबळ उडाली आहे. या तरुणाचा खून झाल्याचा प्राथमिक संशय आहे मात्र शवविच्छेदन अहवालातून तरुणाच्या मृत्यूचे स्पष्ट कारण समोर येणार आहे. संकेत लिलाधर आढाळे (28, भादली) असे मयत तरुणाचे नाव आहे.

शेतात आढळला मृतदेह
संकेत आढाळे या तरुणाचा कडगाव रस्त्यावर पाटचारीजवळ लागून असलेल्या शेतात मृतदेह आढळला आहे. तरुणाच्या डोक्यावर ईजा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तरुणाचा मृतदेह शेतात असल्याची माहिती कळताच नशिराबादचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, एएसआय अलियार खान, समाधान पाटील, किरण बाविस्कर, संजय जाधव, बाळू पाटील आदींनी धाव घेतली.