भादलीत नवविवाहितेची आत्महत्या ; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा

0
नशिराबाद- भादली येथील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अश्‍विनी किरण धनगर (20, भादली) या विवाहितेचा गतवर्षीच विवाह झाला होता मात्र आरोपींनी चारीत्र्याचा संशय घेऊन तसेच गांजपाठ करून विवाहितेला आत्महत्या करण्यास भाग पाडले. भादली येथील धनगरवाड्यातील राहत्या घरी विवाहितेने बुधवारी सकाळी 10 ते 11 वाजेच्या दरम्यान गळफास घेतला.
या प्रकरणी संगीता कडू धनगर (40, रा.पाळधी, ता.धरणगाव) यांच्या फिर्यादीनुसार मयताचा पती आरोपी किरण सुनील धनगर, सासरे सुनील हिरामण धनगर, सासू अरुणा सुनील धनगर, आजल सासू सायनाबाई हिरामण धनगर (सर्व रा.भादली बु.॥) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वर्ष 2017 मधील दिवाळीच्या दोन महिन्यानंतर ते 7 मार्च पर्यंत  वेळोवेळी आरोपींच्या राहत्या घरी चारीत्र्यावर संशय घेऊन, जड-अवजड कामे सांगून, उपाशी ठेवून विवाहितेचा छळ करण्यात आल्याचे  तक्रारीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी.धारबडे करीत आहेत.