भादली गावातील पोलिस बंदोबस्त हटविला

0

जळगाव । भादली येथे झालेल्या हत्त्याकांडात गुन्ह्याचा तपास एकवटला असुन लवकरच गुन्हा उघड होण्याची शक्यता आहे. तसेच मयतांचा व्हिसेरा,ब्लड सॅम्पल आणि इतर आवश्यक नमुने घेवुन नशिराबाद पोलिस प्रयोगशाळांच्या दिशेने रवाना झाले आहे. यातच भादली गावात लावण्यात आलेला पोलिस बंदोबस्त आज हटवण्यात आला असुन आजही काही ग्रामस्थांची चौकशी विचारपुस करुन माहिती घेण्यात आली.

भादली येथील भोळेवाड्यात 20 मार्चला प्रदिप सुरेश भोळे, पत्नी संगीता, मुलगी दिव्या मुलगा चेतन यांची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. गुन्हा घडून सात दिवस पुर्ण झाले असतांना आजही भादली ग्रामस्थांची नशिराबाद पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात येवुन आवश्यक माहिती घेण्यात आली आहे. घडला प्रकारात गुन्ह्याचा तपासात आवश्यक बाबींचे संकलन युद्धपातळीवर करण्यात येत असुन ठोस निर्णयापर्यंत पोचण्यास अद्यापही वेळ लागेल असे चित्र आहे. कायदा व सुव्यस्था बिघडूनये याकरीता भादली गावात लावण्यात आलेला पोलिस बंदोबस्त हटवण्यात आला, गुन्ह्यात आवश्यक असेल त्याच व्यक्तीची चौकशी किंवा विचारपुस करण्यात येत असुन मयत प्रदिप यांच्याशी संबधीत असलेल्या मित्रपरीवारालाही विचारपुस करण्यात आलेली आहे.

चौकशी सुरुच
प्रत्यक्ष चौकशी सोबत तपासात यांत्रिक तपासाची मदत घेण्यात येत आहे, त्यासाठी गुन्हेशाखेची सायबर टिम रात्रंदिवस कामावर जुंपली आहे. उपलब्ध माहितीनुसार तपासात वेगवेगळ्या मुद्द्यांवर डाटा रिपोर्ट तयार होत आहे. मयत प्रदिप सहीत इतर तिघांचा व्हिसेरा प्रिझर्व करण्यात आला होता, तज्ञ डॉक्टरांच्या सुचने नुसार आज संध्याकाळी शवविच्छेदनातुन संकलीत नमुन्यांचे पार्सल मुंबईच्या कलिना प्रयोगशाळेला रवाना झाले आहेत.