भादली हत्याकांडप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

0

जळगाव । तब्बल सव्वा वर्षानंतर भादली हत्याकांड प्रकरणी नशिराबाद पोलिसांनी दोन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींच्या पॉलिग्राफी चाचणीतील अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. रमेश बाबूराव भोळे (वय-62)व प्रदीप उर्फ बाळू भरत खडसे (वय-33) दोन्ही रा. भादली बुद्रुक अशी अटकेतील आरोपींची नावे असून शुक्रवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींनी 22 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, आरोपींनी खून का व कोणत्या कारणासाठी केला? याबाबत लवकरच उलगडा होणार आहे.