भादली हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा!

0

जळगाव । भादली येथील एकाच कुटुंबामधील चौघांची निर्घृण हत्या करण्यात आली. संपूर्ण परिवाराचे जीवनच उद्धवस्त करण्यात आले. अशी धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील भादली येथे भोळे वाड्यात सोमवारी 20 मार्चच्या मध्यरात्री करण्यात आली आहे. मात्र तीन दुःस्वास उलटूनही अद्याप मुख्य आरोपीचा सुगावा लागलेला नसून याबाबत सीबीआय चौकशी करण्याची मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जळगाव यांनी केली आहे. आरोपीना तात्काळ अटक करून कडक कार्यवाही करण्याची मागणी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.

तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
या वेळी संघटनेचे रवींद्र पवार , भगवान सोनार , ललित खरे , नरेंद्र कदम , संभाजी देवरे ,योगेश विसपुते ,योगिनी काळूंखे, नरेश बागडे ,शरद भालेराव , ललित बडगुजर , भरत भामरे, संदीप भामरे, चंदन चौधरी , जुगल, गोरख पाटील, वैभव चौधरी आदी उपस्थित होते. या सामूहिक हत्याकांडाला जबाबदार असणार्‍या आरोपीना तात्काळ अटक करून कडक शासन करावे, अन्यथा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.