भादली हत्याकांडातील दोघांना कोठडी

0

जळगाव : तालुक्यातील भादली येथे मागील वर्षी एकाच रात्री भोळे कुटुंबातील चौघांची निर्घुण हत्या करण्यात आली होती. वैज्ञानिक अहवाल व परिस्थितीजन्य पुराव्यांवरून पोलिसांनी गावातील रमेश बाबुराव भोळे व प्रदिप उर्फे बाळू भरत खडसे (रा.भादली) या दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोन्ही संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज न्या. कांबळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्हा गंभीर असून संशयित पोलिस कोठडीदरम्यान उडवाउडवीची उत्तरे देत आहे. तसेच चौकशी बाकी असल्याचा युक्तीवाद पोलिसांतर्फे सरकारी वकीलांनी केला.

सरकार पक्षातर्फे रुक्तीवाद
भादली खुनाच्या घटनेला 14 महिने होवून देखील या चौघांची नेमक्या कोणत्या कारणावरून या चौघांची हत्या करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रॉलीग्राफ टेस्टच्या वैज्ञानिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. या अहवालावरून व परिस्थितीजन्य पुराव्यांवरून पोलिसांनी रमेश बाबुराव भोळे व प्रदिप उर्फे बाळू भरत खडसे या दोघांना दि.17 मे रोजी रात्री ताब्यात घेतले होते. न्यायालयाने सुरवातीला या दोघांना 5 दिवसांची कोठडी दिली होती. मुदत संपल्याने दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारपक्ष व बचावपक्षातर्फे करण्यात आलेल्या युक्तीवादानंतर दोन्ही संशयितांना तीन दिवसांची वाढीव कोठडी देण्यात आली.