भादली हत्यांकाडप्रकरणी नाशिराबाद पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली होती. दोन्ही संशयित कारागृहात होते. दरम्यान पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र न दाखल केल्याने या दोन्ही संशयितांना न्यायालयाने जामीन दिला.
भादली गावातील प्रदीप भोळे, संगीता भोळे, दिव्या भोळे, व चेतन भोळे यांची २० मार्च २०१७ या चौघांची निर्घूण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तब्बल १४ महिन्यानंतर पोलिसांनी १७ मे २०१८ रोजी रमेश भोळे व प्रदिप खडसे या दोघांना अटक केली होती. हे दोघे संशयित न्यायालयीन कोठडी होते. पोलिसांनी दोघांच्या नार्कोटेस्टची परवानगी न्यायालयात मागितली होती. दरम्यान न्यायालयाने नार्कोटेस्टची परवानगी नाकारली होती. दोन्ही संशयितांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता.या गुन्ह्याचा खटल्याचे फौजदारी दंड प्रक्रियाचे संहिता कलम १६७(२) नुसार पोलिसांनी संशयितांना अटकेपासून ९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल न केल्यामुळे न्या. बी.डी.गोरे यांच्या न्यायालयाने दोन्ही संशयितांची जामीनावर मुक्तता केली आहे. संशयितांतर्फे ऍड. प्रकाश बी. पाटील यांनी कामकाज पाहिले.