भादली हत्याकांडातील दोन्ही संशयितांना जामीन

0

जळगाव प्रतिनिधी । भादली हत्याकांडप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले रमेश बाबुराव भोळे व प्रदीप उर्फ बाळू भरत खडसे या दोघांना शनिवारी जामिनावर मुक्त करण्यात आले.

भादली गावातील प्रदीप सुरेश भोळे (वय ४५), त्यांच्या पत्नी संगीता (३०), मुलगी दिव्या (७) व मुलगा चेतन (३) यांचा १९ मार्च २०१७ च्या रात्री निर्घृण खून झाला होता. या प्रकरणी १७ मे २०१८ रोजी नशिराबाद पोलिसांनी रमेश बाबूराव भोळे व प्रदीप उर्फ बाळू भरत खडसे या दोघांना अटक केली होती.
या दोघांची नार्कोटेस्ट घेण्याची परवानगी पोलिसांनी मागितली होती. हा अर्ज न्यायालयाने २४ जुलै रोजी फेटाळला होता. यानंतर या दोघांना जामिनावर मुक्त करण्यात आले.