जळगाव। भादली ब्रु येथील पतीपत्नीसह चौघांची निघृण हत्या करण्यात आली होती. सात दिवस उलटले असुन अद्याप तपासाचा नेमका मार्ग गवसलाच नाही. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. जालींदर सुपेकर, अप्पर अधीक्षक मोक्षदा पाटील, निरीक्षक राजेशसींह चंदेल, राहुल वाघ आदींनी रविवारी दुपारी तीन ते रात्री उशिरा पर्यंत गावातुन चौकशीसाठी बोलावेल्या ग्रामस्थांची चौकशी केली.
गुन्ह्या बाबत माहिती देऊ शकतील अशी शक्यता असलेल्या सुरवातीला तीन व नंतर दोन अशा पाच ग्रामस्थांना आज नशिराबाद पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. प्रदिप सुरेश भोळे याचा औरंगाबाद येथे वास्तव्याला असलेला चुलत भाऊ यतीन मधुकर भोळे याला बोलावण्यात आले होते. यतिन कडून कौटूंबीक आणि नातेसंबधा बाबतची माहिती घेण्यात आली असुन रात्री उशिरा पर्यंत एका मागुन एक प्रश्नोत्तराच्या स्वरुपात चौकशी सुरु होती.