भादली हत्याकांडाविरोधात संघटनांतर्फे इन्साफ मोर्चा

0

जळगाव। तालुक्यातील भादली येथील शेतकरी कुटुंबातील चार जणांनी सोमवारी 20 रोजी निर्घुण हत्या करण्यात आली. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असुन या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील दहा वेगवेगळ्या संघटना एकत्र आल्या असुन त्यांनी घटनेचा निषेध नोंदविण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारी 24 मार्च रोजी या संघटनांकडून इन्साफ मोर्चा काढला जाणार आहे. आंबेडकर स्मारकापासुन ते जिल्हाधिकारी कार्यालयातर्यत हा मोर्चा काढला जाणार आहे. शनिवारी 25 मार्च रोजी जिल्हाबंदचा आवाहन करण्यात आला असून 1 एप्रिल रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी
अशी माहिती पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. घटनेचा न्यायालयीन खटला प्रसिध्द सरकारी वकील अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवुन घटनेची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात यावी, आरोपींना तात्काळ अटक करुन फाशीची शिक्षा देण्यात यावी आदी मागणी संघटनांतर्फे करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे असंवेदनशील असून त्यांनी घटनेची दखल देखील घेतली नसल्याचे आरोप करण्यात आले. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी दोन दिवसात आरोपींना अटक करण्याचे आश्‍वासन दिले होते मात्र चार दिवस उलटल्यानंतरही आरोपी सापडले नसल्याने त्यांनी भुमिका स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात आली आहे. छत्रपती सेना, लेवा पाटील संघटना, रिपब्लिकन पार्टी सर्व गट, राष्ट्रीय विद्यार्थी सेना, दलीत मोर्चा, शहीद टिपु सुलतान संघटना, रमाई, जीजाऊ, मराठा ब्रिगेड संघटना, रिक्षा चालक संघटनांचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, नागरिकांनी यात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.