भानखेडा शिवारात गावठीचे 800 लीटर रसायन उद्ध्वस्त

0

भुसावळ: तालुक्यातील भानखेडा शिवारातील तापी नदी काठी गावठी दारू पाडली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी गुरुवारी केलेल्या कारवाईत चार ड्रममधील 800 लीटर गावठीचे रसायन उद्ध्वस्त करण्यात आले. लिलाधर नामदेव सोनवणे (साकेगाव) हा संशयीत आरोपी पसार झाला असून त्याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.