पिंपरी-चिंचवड : कोयाळी येथील भानोबा गुरुकुल न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी पर्यावरण समितीची स्थापना करण्यात आली. पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील यांनी विद्यार्थी पर्यावरण समितीच्या सदस्यांना इको क्लबचे महत्त्व समजावून सांगितले. याप्रसंगी विद्यार्थी पर्यावरण समितीला मान्यवरांच्या हस्ते पर्यावरणपूरक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी पुरुषोत्तम पिंपळे, प्रभाकर मेरूकर, गोविंद चितोडकर, मुख्याध्यापिका सुवर्णा काजळे, प्रतिभा कोळेकर, कल्पना तांबे आदी उपस्थित होते. विनिता दाते यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा, पर्यावरणपूरक सवयी आणि दिवाळीतील विविध प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग याविषयी मार्गदर्शन केले. ई-वेस्ट मानवी आरोग्यास घातक असून, त्याचे योग्य व्यवस्थापन करायला हवे, असेही दाते यावेळी म्हणाल्या. इंग्रजीच्या शिक्षणासाठी अनुकूल शाळा म्हणून या शाळेला परिसरात ओळखले जाते. पर्यावरणाविषयी आवड विद्यार्थ्यांच्या मनात वाढीस लागावी, या उद्देशाने या समितीची स्थापना करण्यात आली.