भामट्यांनी महिलेची पर्स रांची एक्स्प्रेसमधून लांबवली

भुसावळ : रांची ते मनमाड असा प्रवास करीत असलेल्या महिला प्रवाशाची 18 हजारांचा ऐवज असलेली पर्स चोरट्यांनी लांबवली. भुसावळ जंक्शन सोडल्यावर ही घटना शुक्रवारी पहाटे 1.30 वाजता घडली.

भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल
पर्समध्ये दोन हजारांच्या रोकडसह मोबाईल, एटीएम कार्डसह अन्य साहित्य होते. रांची एक्स्प्रेसच्या एस 12 या डब्यातील 49 नंबरच्या सीटवर बसून रोपाअली राजेश पटेल (46, रा.औरंगाबाद) या प्रवास करीत असतांना गाडीने भुसावळ स्थानक सोडल्यावर आऊटरला कोणी तरी चोरट्याने पटेल यांची पर्स लांबविली. मनमाड लोहमार्ग पोलिस ठाण्यातील गुन्हा भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. तपास सहायक फौजदार मधुकर पारधी करीत आहेत.