जळगाव। रामानंदनगरातील निवृत्त शिक्षिका विजया नारायण कदम (वय 74) या 7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांच्या चंद्रमा अपार्टमेंटच्या बाहेर उभ्या होत्या. त्यावेळी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांची 54 हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली होती.
या प्रकरणी कदम यांच्या फिर्यादीवरून रामानंद पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात रामानंद पोलिसांनी कासीम शहा गरीब शहा इराणी (वय 29, रा. श्रीरामपूर) याला अटक केली होती. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत शनिवारी संपली. त्याला न्यायाधीश ठोंबरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.